भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीत मतभेद

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या  निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीत मतभेद
Published on

भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील युतीवरून महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आघडीतील या राजकीय मतभेदांचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडी धर्माला तिलांजली देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडाऱ्यात काँग्रेसने भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाशी युती करून सत्तेचे समीकरण जुळवले. तर गोंदियात राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असूनही काँग्रेसला विरोधी बाकांवर बसावे लागले आहे; मात्र गोंदियामधील राष्ट्रवादीची ही खेळी नाना पटोले यांच्या जिव्हारी लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in