संजय निरूपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार; स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळले

आंब्याच्या आकर्षक रंग आणि चवीमुळे त्याला 'फळांचा राजा' म्हणून गौरवले जाते. देशातील ५० टक्के आंबा उत्पादन दक्षिणेकडील राज्यांत होते. तेथे गतवर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादन १५ टक्क्यांनी घटले होते.
संजय निरूपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार; स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळले

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी पक्षश्रेष्ठींबद्दल शेरेबाजी केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेसमवेत (उबाठा) जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच निरूपम यांनी पक्षश्रेष्ठींबद्दल शेरेबाजी केली, त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत घेण्यात येणार आहे.

काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीतून निरूपम यांचे नाव वगळले आहे, काँग्रेस पक्षासमोर सध्या आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे कागदपत्रांवरील खर्च कमी करावा आणि असलेल्या ऊर्जेची बचत करून त्याचा वापर पक्ष वाचविण्यासाठीच करावा, असे निरूपम म्हणाले. आपण पक्षाला दिलेली मुदत बुधवारी संपली असल्याने पुढील दिशा गुरुवारी जाहीर करू, असेही निरूपम म्हणाले.

यंदा आंब्याला चांगला बहर

आंब्याच्या आकर्षक रंग आणि चवीमुळे त्याला 'फळांचा राजा' म्हणून गौरवले जाते. देशातील ५० टक्के आंबा उत्पादन दक्षिणेकडील राज्यांत होते. तेथे गतवर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादन १५ टक्क्यांनी घटले होते. यंदा देशभरात हवामान बरेचसे अनुकूल असल्याने आंब्याला चांगला मोहोर आला आणि फलधारणाही व्यवस्थित झाली आहे.

अतिरिक्त उष्णतेचा आंबा उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. दक्षिणेकडील राज्यांत तर भरघोस आंबा उत्पादन होईल, असे संशोधकांना वाटते. त्यामुळे या उन्हाळ्यात बाजारात फळांच्या राजाची रेलचेल राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, तरी ग्राहकांना यंदा स्वस्तात आंबा खरेदी करण्यास मिळेल की नाही, याची अद्याप शाश्वती देता येत नाही.

logo
marathi.freepressjournal.in