बेस्ट उपक्रमाच्या डिजिटल सेवेची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत

परिवहन विभाग प्रवाशांना व वीज विभाग वीज ग्राहकांना विविध प्रकारच्या डिजिटल सेवासुविधा देत आहे
बेस्ट उपक्रमाच्या डिजिटल सेवेची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत
Published on

बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना बेस्ट बस, वीज विभाग यांच्या माध्यमातून देऊ केलेल्या डिजिटल सेवेची माहिती घेतल्यानंतर दिल्ली राज्याचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत हे चांगलेच प्रभावित झाले. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या डिजिटल सेवेची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.

बेस्ट उपक्रम तोट्यात असले तरी परिवहन विभाग प्रवाशांना व वीज विभाग वीज ग्राहकांना विविध प्रकारच्या डिजिटल सेवासुविधा देत आहे. त्यामुळे त्याची चर्चा मुंबईतील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गहलोत हे मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी मंगळवारी बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्यालयात धावती भेट दिली. यावेळी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी त्यांचे बेस्टमध्ये स्वागत केले.

बेस्टच्या डिजिटल तिकीट प्रणाली आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड यासंबंधी सविस्तर माहिती देणारे सादरीकरण महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी केले. भविष्यकाळातील बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसगाड्या समाविष्ट करून प्रवाशांना सुलभ आणि प्रदूषण विरहित बस प्रवास देण्याविषयी बेस्ट कटिबद्ध असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in