अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्समुळे मुंबईचे विद्रुपीकरण बॅनर्स तात्काळ हटवले जाणार; पालकमंत्र्यांची माहिती

जागोजागी भले मोठे होर्डिंग्ज लावून मोकळ्या जागा व्यापल्या जात आहेत
अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्समुळे मुंबईचे विद्रुपीकरण 
बॅनर्स तात्काळ हटवले जाणार; पालकमंत्र्यांची माहिती

मुंबई : वाढदिवसाच्या शुभेच्छा, सभेबाबत पोस्टर्स, होर्डिंग्ज, बॅनर्समुळे मुंबईचे विद्रुपीकरण होत आहे; मात्र आता बेकायदा पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्ज कोणाच्या दबावाला बळी न पडता हटवा, असे सक्त आदेश मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत; मात्र आजही मुंबईत ठिकठिकाणी बेकायदा पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्ज लावण्यात आले असून, नमूद वेळेत ते काढल्यास ते तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

राजकीय सभा, नेते मंडळींचे वाढदिवसानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी बेकायदा पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्ज झळकतात; मात्र बेकायदा पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सण, उत्सवानिमित्त शहरात होर्डिंग्ज, बॅनर्स जागोजागी लावण्यात आले आहेत. यात राजकीय पक्ष- नेत्यांचे बॅनर्स अधिक आहेत. गेले काही दिवस या बॅनर्सवर पालिकेकडून कारवाई होत नसल्याने शहर स्वच्छ कसे होणार? असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांना माध्यमांनी पत्रकार परिषदेत विचारला. यावर बोलताना अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज तात्काळ हटवले जातील, असे केसरकर यांनी सांगितले.

मुंबईत अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावण्यावर निर्बंध आहेत. असे असतानाही जागोजागी भले मोठे होर्डिंग्ज लावून मोकळ्या जागा व्यापल्या जात आहेत. राजकिय पुढाऱ्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे, आदी कार्यक्रमांच्या जाहिरातींचे अनधिकृत होर्डिंग्जची भर पडली आहे. यातील बहुतांशी होर्डिंग्ज अनधिकृत असल्याच्या तक्रारींची नोंद पालिकेकडे होते. या तक्रारीनंतर पालिकेकडून असे होर्डिंग्ज काढले जातात. तरीही नियम धाब्यावर बसवून भले मोठे होर्डिंग लटकवून शहर विद्रुप केले जात असल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in