अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी, नवाब मलिक यांचीच चर्चा

अजित पवार यांच्या मुंबईतील जनसन्मान यात्रेची चर्चा होण्यापेक्षा झिशान सिद्दीकी व नवाब मलिक यांच्याच नावाची चर्चा रंगली.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी, नवाब मलिक यांचीच चर्चा
File Images
Published on

मुंबई : अजित पवार यांच्या मुंबईतील जनसन्मान यात्रेची चर्चा होण्यापेक्षा झिशान सिद्दीकी व नवाब मलिक यांच्याच नावाची चर्चा रंगली. झिशान सिद्दीकी व नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याबरोबर स्टेजवर उपस्थित असल्याने महायुतीसह मविआच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉसवोटिंग करणाऱ्यांमध्ये झिशान सिद्दीकी यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यात मंगळवारी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी सहभागी झाले. झिशान सिद्दीकींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

जनसन्मान यात्रा मुंबईतील वांद्रे या भागात दाखल झाली. सिद्दीकी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, काँग्रेस पक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रॅली माझ्या मतदारसंघातून जात असताना त्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी मी घेतली. राज्यातील असंख्य महिलांना फायदा होईल." काँग्रेस पक्षावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. "माझा पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करत असून, मला कार्यक्रम व सभांसाठी बोलावले जात नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रा माझ्या मतदारसंघातून गेली, मात्र मला यात्रेचे निमंत्रण देण्यात आले नाही.

logo
marathi.freepressjournal.in