पोलीस किती वर्ष चौकशी करणार? दिशा सालियन मृत्यू प्रकरण; हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी एका १४ मजल्याच्या इमारतीवरून पडल्याने मृत्यू झाला. केंद्रीय तपास यंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांनी आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला.
पोलीस किती वर्ष चौकशी करणार? दिशा सालियन मृत्यू प्रकरण; हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Published on

मुंबई : दिशा सालियन हिच्यावर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजितसिंग भोसले यांच्या खंडपीठाने घटना घडून आज पाच वर्षे होत आली. अजून किती वर्षं या प्रकरणाचा तपास करणार आहात, असा सवाल केला. दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी एका १४ मजल्याच्या इमारतीवरून पडल्याने मृत्यू झाला. केंद्रीय तपास यंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांनी आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला. यावेळी मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडले. दिशाचा मृत्यू हा अपघाती नव्हता, तिच्यावर मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत दिशाचे वडिल सतिश यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील ॲॅड. मानकुवर देशमुख यांनी पोलिसांनी अनेक वेळा याचिकाकर्ता आणि त्यांच्या पत्नीचे जबाब नोंदवले होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की त्यांना कोणावरही संशय नाही. आता पाच वर्षांनंतर, वडील हे वाद उपस्थित करत आहेत,’ याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना मृत्यूची चौकशी अजूनही सुरू असल्याचे सांगताच खंडपीठाने मृत्यूला पाच वर्षे झाली आहेत आणि पोलिसांना फक्त हे निश्चित करायचे आहे की हा मृत्यू आत्महत्या आहे की सदोष मनुष्यवध अशी टिपणी करताना किती वर्षे चौकशी करणार असा सवाल उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in