Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला वेगळे वळण; सीबीआय म्हणते हे प्रकरण कधीही हाताळले नाही

दोन दिवसांपूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Case) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते एसआयटी चौकशीचे आदेश
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला वेगळे वळण; सीबीआय म्हणते हे प्रकरण कधीही हाताळले नाही

काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशनामध्ये दिशा सालियन प्रकरणावरून (Disha Salian Case) मोठा गोंधळ झाला होता. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणात आता आणखी एक बाबा समोर आली असून सीबीआयने अधिकृतरीत्या जाहीर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, 'दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयने कधीही हाताळले नाही. सीबीआय कडे हे प्रकरण कधीही सोपवण्यात आले नव्हते. त्यामुळे यामध्ये सीबीआयने कुठलाही तपास केलेला नाही. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे.

दिशा सालियनचा मृत्यू हा इमारतीवरुन पडून झाला असल्याचा निष्कर्ष सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात काढला होता. मात्र, दिशा सालियन प्रकरणाचा वेगळा तपास हा सीबीआयकडे नव्हता, असे काही दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. तसेच, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर लोकसभेत आरोप केले की, सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील 'एयू' म्हणजे आदित्य ठाकरे आहेत. यावरून महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेत खूप मोठा वाद सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झाला. त्यानंतर सीबीआयने अधिकृतरीत्या दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे आता दिशा सालियन प्रकरणात वेगळे वळण मिळाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in