दिशा सालियनप्रकरणी आता दुसऱ्या न्यायपीठासमोर सुनावणी

दिशा सालियन प्रकरणात रजिस्ट्रारच्या चुकीमुळे अधिकार नसलेल्या पीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी लागले होते.
दिशा सालियनप्रकरणी आता दुसऱ्या न्यायपीठासमोर सुनावणी
Published on

मुंबई : दिशा सालियन प्रकरणात रजिस्ट्रारच्या चुकीमुळे अधिकार नसलेल्या पीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी लागले होते. वास्तविक हे प्रकरण सारंग कोतवाल यांच्या पीठासमोर लागायला पाहिजे होते. मात्र, आता न्यायपीठाने हे प्रकरण कोतवाल यांच्या पीठासमोर पाठवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिशाच्या वकिलांकडून बाजू मांडणाऱ्या ॲॅड. नीलेश ओझा यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या पीठासमोर होणार आहे.

दिशा सालियन प्रकरण मुख्य न्यायमूर्तीच्या पीठासमोर जायला हवे, असे आम्हाला वाटते. मात्र यासंदर्भात काही सकारात्मक गोष्टी झाल्या आहेत. आमच्या मागण्यांना सरकारचे समर्थन असल्याचे नीलेश ओझा यांनी म्हटले आहे. यासंदर्भात सरकारी वकिलांसोबत माझी चर्चा झाली आहे. या प्रकरणात याचिकेतील मागण्यांना सरकारचे समर्थन असल्याचे न्यायालयात सांगितले जाणार आहे. आमच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आम्ही सरकारच्या विरोधात बोलणार नाही, असे देखील ॲॅड. नीलेश ओझा यांनी सांगितले.

दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाची सुनावणी बुधवारी मुंबई हायकोर्टात झाली. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये आदित्य ठाकरेंसह चार प्रमुख व्यक्तींविरुद्ध चौकशीचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in