दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्याने चौकशी करा! वडिलांची न्यायालयात मागणी; सुनावणी आता ३ जुलैला

मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्याने चौकशी करा! वडिलांची न्यायालयात मागणी; सुनावणी आता ३ जुलैला
Published on

मुंबई : दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली.

न्या. सारंग विजयकुमार कोतवाल आणि न्या. मंजुषा अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी ३ जुलैला निश्चित केली.

केंद्रीय तपास यंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांनी दिशा सालियनने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला. यावेळी मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे.

साक्षी-पुराव्यांच्या सखोल चौकशीची मागणी

सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणे झाले? तसेच सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी-पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकेत करताना आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in