प्रलंबित कॅरोसेल रद्द केल्याप्रकरणी नाराजी; कुलाब्याच्या पर्यटनाला पालिकेचा 
अडथळा,नार्वेकरांचा आरोप

प्रलंबित कॅरोसेल रद्द केल्याप्रकरणी नाराजी; कुलाब्याच्या पर्यटनाला पालिकेचा अडथळा,नार्वेकरांचा आरोप

कुलाब्यातील प्रलंबित हॉर्स कॅरोसेल प्रकल्पाला पालिकेने जाणूनबुजून स्थगिती दिल्याचा आरोप कुलाबा विधानसभेचे आमदार राहुल नार्वेकर यांनी केला आहे. कुलाब्याचे पर्यटन आणि नागरिकांसाठी अनुकूल ठिकाण होण्याच्या मार्गात पालिका प्रशासन अडथळा ठरत असल्याने नार्वेकर यांनी पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
Published on

मुंबई : कुलाब्यातील प्रलंबित हॉर्स कॅरोसेल प्रकल्पाला पालिकेने जाणूनबुजून स्थगिती दिल्याचा आरोप कुलाबा विधानसभेचे आमदार राहुल नार्वेकर यांनी केला आहे. कुलाब्याचे पर्यटन आणि नागरिकांसाठी अनुकूल ठिकाण होण्याच्या मार्गात पालिका प्रशासन अडथळा ठरत असल्याने नार्वेकर यांनी पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

कॅरोसेल प्रकल्पाला पालिकेच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागाकडून मंजुरी देण्यात आली होती. तरीही काळा घोडा, कुलाबा कॉजवे, रिगल जंक्शन आणि गेटवे ऑफ इंडिया प्रकल्पांप्रमाणे हा प्रकल्पही स्थगित करण्यात आला आहे.

पर्यटकांना या मैदानात परत आणण्यासाठी कुपरेज मैदानावर मुलांना खेळण्यासाठी सर्व आवश्यक सुविधांसह कॅरोसेल स्थापन करण्याचा प्रस्ताव नार्वेकर यांनी दिला होता. मात्र या प्रकल्पांना पालिका प्रशासनाने लाल कंदील दाखवला आहे. यासाठी नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. कुलाबा येथील कुपरेज मैदानातील कॅरोसेल हा पर्यटकांसाठी अनुकूल उपक्रम आहे.

काय आहे कॅरोसेल?

कॅरोसेल, ज्याला मेरी-गो-राऊंड असेही म्हटले जाते, ही एक राइड आहे ज्यामध्ये वर्तुळाच्या आकाराचा फिरणारा प्लॅटफॉर्म असतो. कॅरोसेलमध्ये ऑटोमोबाईल, ट्रेन आणि प्राणी यांसारख्या वस्तूंसारखे दिसण्यासाठी जागा बनवलेली असते. कॅरोसेलवर दिसणारे प्राणी घोडे, हत्ती आणि हंस असू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in