मंत्राक्षरे, भक्ती आणि शक्ती चित्रकृतींचे प्रदर्शन

पुण्याच्या या दोन्ही चित्रकारांनी अभिनव कला महाविद्यालयामधून कलाशिक्षण घेतले आहे. आजपर्यंत दोघांची अनेक प्रदर्शने मुंबई आणि पुणे येथे झाली आहेत.
मंत्राक्षरे, भक्ती आणि शक्ती चित्रकृतींचे प्रदर्शन
PM

मुंबई : चित्रकार व सुलेखनकार सुभाष जमदाडे या ‘मंत्राक्षरे’ आणि चित्रकार सुरेश गोसावी यांच्या ‘भक्ती आणि शक्ती’ या विषयावरील चित्रकृतींचे प्रदर्शन २६ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे रंगणार आहे.

पुण्याच्या या दोन्ही चित्रकारांनी अभिनव कला महाविद्यालयामधून कलाशिक्षण घेतले आहे. आजपर्यंत दोघांची अनेक प्रदर्शने मुंबई आणि पुणे येथे झाली आहेत. सुभाष जमदाडे हे सुलेखनकार म्हणून परिचित आहेत. सुलेखनातून चित्रकृती (पेंटिंग ) साकाराचे कलाप्रयोग ते सातत्याने करत असतात. यावेळी त्यांनी हिंदू संस्कृतीतील अध्यात्म आणि उपासना मंत्र यावर सर्जनात्मक आविष्कारातून विलोभनीय कलाकृती साकारल्या आहेत. ओंकार आणि गायत्री मंत्र यांचा दृश्यानुभव पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून एका उच्च आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातो.

सुरेश गोसावी हे चित्रकलेचे निस्सिम भक्त आहेत. नैराश्येतून एकाग्रतेकडे, सुखाकडून समाधानाकडे जाण्यासाठी भक्ती आणि श्रद्धा आवश्यक असते. त्याचा प्रत्यय गोसावी यांच्या भक्ती आणि शक्ती या चित्र मालिकेतून येतो.

logo
marathi.freepressjournal.in