मुंबई कस्टम विभागाकडून दीड हजार कोटींच्या अंमली पदार्थाची विल्हेवाट

मुंबई कस्टम विभागाने तसेच डीआरआयने गत वर्षभरामध्ये मुंबईसह नवी मुंबईत वेगवेगळ्या कारवाया करून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पकडले
मुंबई कस्टम विभागाकडून दीड हजार कोटींच्या अंमली पदार्थाची विल्हेवाट
Published on

अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर वेगवगळ्या कारवाया करून मुंबईच्या कस्टम विभागाने गेल्या वर्षभरामध्ये पकडलेला तब्बल ३५० किलो वेगवेगळ्या अंमली पदार्थाची कस्टम विभागाने शुक्रवारी तळोजा येथील कंपनीमध्ये शास्रोक्त पद्धतीने नष्ट करून त्याची विल्हेवाट लावली. नष्ट करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल दीड हजार कोटी इतकी आहे.

मुंबई कस्टम विभागाने तसेच डीआरआयने गत वर्षभरामध्ये मुंबईसह नवी मुंबईत वेगवेगळ्या कारवाया करून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पकडले आहे. यात १९८ किलो मेटाफेटामाईन, ९ किलो कोकेन, १६.६ किलो हेराईन, ३२ किलो गांजा त्याचप्रमाणे रेव्ह पार्टीसाठी वापरण्यात येत असलेले मेट्रक्सचे ८१ टॅबलेट आणि एमडीएचे २९८ टॅबलेट अशा एकुण ३५० किलो वजनाचे अंमली पदार्थांचा समावेश होता.

हा अंमली पदार्थाचा साठा कस्टम विभागाने तळोजा येथील कंपनीत नेऊन तज्ञांच्या मदतीने शास्त्रोक्त पध्दतीने ते नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे संपुर्ण व्हिडीयो शूटींग देखील करण्यात आले आहे. कस्टम विभागाकडुन नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल दीड हजार कोट रुपये किंमत असल्याची माहिती मुंबई कस्टम विभाग झोन-३चे सहाय्यक आयुक्त श्रीधर धुमाळ यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in