'घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत पालिकेने केले ४१ लाख तिरंग्यांचे वाटप,तिरंगा रोषणाईने २५० इमारती उजळल्या

पालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी केले आहे
'घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत पालिकेने केले ४१ लाख तिरंग्यांचे वाटप,तिरंगा रोषणाईने २५० इमारती उजळल्या

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षें पूर्ण होत असून केंद्र सरकारच्या सुचनेनुसार देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दक्षिण मुंबईतील हेरिटेज इमारतींसह मरिन ड्राइव्ह परिसरातील २८ निवासी इमारती, पालिका शाळांच्या ५१ इमारतींसह एकूण २४३ इमारती, १०० झाडे, ६० विद्युत खांब आणि थोर महापुरुषांचे १९ पुतळे तिरंगा रोषणाईने उजळले आहेत. तर ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत पालिकेने तब्बल ४१ लाख तिरंग्यांचे वाटप घरोघरी केले आहे.

अमृत महोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्ताने पालिकेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्यासाठी ४५०० बॅनर्स, १५०० स्टॅण्डीज, ३५० होर्डिंग्ज, सार्वजनिक उद्घोषणा, प्रभातफेरी, मेळावे, शाळांमधील स्पर्धा व इतर भरगच्च उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. घरोघरी तिरंगा अभियानात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावे, राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरी फडकावताना केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेने तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेने अशा योग्य स्थितीत राष्ट्रध्वज फडकवावा, अभियान कालावधी संपल्यानंतर आपला राष्ट्रध्वज तिरंगा संस्मरणीय आठवण म्हणून आपल्या घरी जपून ठेवावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी केले आहे.

दरम्यान, पुरातन वास्तू जतन अभियंता विभागाकडून ८ पुरातन वास्तू, ८२ पालिका इमारती, ४८ शासकीय इमारती, १०५ खासगी अशा एकूण २४३ महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली.

साडेचार लाख सदोष झेंडे बदलले

पालिकेच्या माध्यमातून तिरंग्याचे मोफत वाटप करण्यात आले. टाटा समुहानेदेखील १ लाख राष्ट्रध्वज पालिकेला दिले आहेत. ४० लाख साठ्यातील सदोष आढळलेले सुमारे ४ लाख ५० राष्ट्रध्वजदेखील तातडीने बदलून संबंधित पुरवठादाराकडून उपलब्ध करून त्यांचे वाटपही करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in