शिवडी स्वच्छ व सुंदर कचरा डब्याचे वाटप!

विधी मंडळाचे गटनेते अजय चौधरी यांच्या हस्ते डब्याचे वाटप करण्यात आले.
शिवडी स्वच्छ व सुंदर कचरा डब्याचे वाटप!

मुंबई : मुंबई कचरा मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवडीत कचरा संकलनासाठी मोठे डबे वाटप करण्यात आले आहेत. विधी मंडळाचे गटनेते अजय चौधरी यांच्या हस्ते डब्याचे वाटप करण्यात आले.

शिवडी कॉटन ग्रीन प्रभाग क्रमांक २०६ मधील हिरजीबाग, कृष्णा प्रेस, विठ्ठल विनायक सदन, आशिर्वाद, आझाद नगर, मुलराज भवन, टिळक बिल्डिंग आदी भागात कचऱ्याचे डबे वाटप केले. यावेळेस माजी आमदार दगडू सकपाळ, माजी नगरसेवक सचिन पडवळ,अनिल कोकीळ शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, मिनार नाटळकर,गोपाळ खाडे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in