
मुंबई : जोगेश्वरीचे शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक माजी नगरसेवक अनंत नर यांच्या माध्यमातून प्रभागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना इच्छापूर्ती गणेश मंदिर, शामनगर येथील सभागृहात मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वायकर यांनी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील समस्या सभागृहात लक्षवेधी मांडल्यायाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला