महिलांना शिलाई मशीनचे वाटप

उत्तर भारतीय संघाच्या वांद्रे पूर्व येथील सभागृहात ७६वा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार
महिलांना शिलाई मशीनचे वाटप

मुंबई : उत्तर भारतीय संघाच्या वांद्रे पूर्व येथील सभागृहात ७६वा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार असून यावेळी ७६ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर. एन. सिंग म्हणाले की, ७६ व्या स्वातंत्र्यदिनी देशभक्तीने रंगलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजकार्याला चालना देण्याचा संघाचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्याचा लाभ समाजातील शेवटच्या फळीतील लोकांना मिळावा यासाठी ७६ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे महिलांचे सक्षमीकरण होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in