दिवाळी मुहूर्ताचे ट्रेडिंग आज संध्याकाळी ६:१५ वाजता

दिवाळीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे शेअर बाजारासाठी हा दिवस खूप खास आहे. या
दिवाळी मुहूर्ताचे ट्रेडिंग आज संध्याकाळी ६:१५ वाजता

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भारतीय शेअर बाजार - एनएसई आणि बीएसई हे २४ ऑक्टोबर २०२२ रोजी तासभरासाठी उघडतील. बीएसई आणि एनएसईवर उपलब्ध सूचनेनुसार इक्विटी, इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग संध्याकाळी ६:१५ वाजता सुरू होईल आणि एक तासानंतर ७:१५ वाजता बंद होईल, तर प्री-ओपन सत्र संध्याकाळी ६:०० वाजता सुरू होईल आणि ६:०८ वाजता संपेल. दिवाळी ही नवीन वर्षाची सुरुवातही होते. यावेळी दिवाळीपासून संवत २०७९ सुरू होणार आहे.

दिवाळीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे शेअर बाजारासाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी बाजार बंद असतो, पण एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन केले जाते. दिवाळीच्या काळात शेअर बाजार एका तासासाठी खुला असेल, यादरम्यान तुम्ही गुंतवणूक करू शकता. हा ट्रेंड विशेषतः गुजराती आणि मारवाड्यांमध्ये लोकप्रिय आहे. मुहूर्ताच्या व्यवहारापूर्वी दलाल स्टॉक एक्स्ाचेंजमधील खात्यांची पूजा करतात. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी व्यापाऱ्यांची श्रद्धा आहे. आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्स्ाचेंज बीएसई गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ 'मुहूर्त ट्रेडिंग' करत आहेत.

मुहूर्ताच्या व्यापाराच्या वेळी छोटीशी गुंतवणूक करून चांगली गुंतवणूक करा. तसेच गुंतवणूक करताना लक्षात ठेवा की, कोणते शेअर्स तुम्हाला दीर्घकाळात चांगले परतावा देऊ शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in