विद्युत वाहिन्यांजवळ मकरसंक्रांतीला पतंग उडवू नका; अदानी इलेक्ट्रिसिटीचे आवाहन

पतंग उडवणाऱ्यांना सावध करत वाहिन्यांजवळ पतंग उडवू नये, असे आवाहन केले आहे.
विद्युत वाहिन्यांजवळ मकरसंक्रांतीला पतंग उडवू नका; अदानी इलेक्ट्रिसिटीचे आवाहन

मुंबई : ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवल्यास, वीजप्रवाह खंडित होऊ शकतो. तसेच पतंग उडवणाऱ्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवू नका, असे आवाहन अदानी इलेक्ट्रिसिटीने केले आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटी आपल्या ३१.५ लाख ग्राहकांना विश्वसनीय वीजपुरवठ्यासाठी भूमिगत वितरण जाळे असले तरी मुंबईबाहेरून वीज आणणाऱ्या उच्च दाबाच्या पारेषण वाहिन्या शहरात अस्तित्वात आहेत. त्यामुळे पतंग उडवणाऱ्यांना सावध करत वाहिन्यांजवळ पतंग उडवू नये, असे आवाहन केले आहे.

...तर १९१२२ या नंबर संपर्क साधा!

पारेषण वाहिन्यांजवळ असुरक्षित पतंग उडवल्याने कोणतीही अप्रिय घटना लक्षात आली किंवा कळली तर कृपया एईएमएलच्या १९१२२ या पॉवर हेल्पलाईनवर त्वरित कळवावे, असे आवाहन एईएमएलने या भागातील ग्राहक आणि नागरिकांना केले आहे. यामुळे कंपनीकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in