तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचे आहे ना ? राणेंचा विरोधकांना सवाल

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेतील वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उडी घेतली आहे
तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचे आहे ना ? राणेंचा विरोधकांना सवाल
ANI

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेतील वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. नारायण राणे यांनी आज आमदार सदा सरवणकर यांच्या घरी भेट घेतली. मुंबईतील प्रभादेवी येथे झालेल्या राड्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास नारायण राणे हे सदा सरवणकर यांच्या दादर येथील निवासस्थानी पोहोचले. अनंत चतुर्दशी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्या गटात वाद झाला. दोघेही एकेकाळी सहकारी होते. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सदा सरवणकर हे आता शिंदे गटाचे आमदार आहेत. दादर-प्रभादेवीमध्ये महेश सावंत हे त्यांचे कट्टर विरोधक मानले जात आहेत. एकंदरी सदा सरवणकर, महेश सावंत आणि नारायण राणे यांच्यातील जुनी जवळीक आणि सध्याचे ताणलेले संबंध पाहता राणे आणि सरवणकर यांच्यातील ही भेट राजकीयदृष्ट्या आणि प्रभादेवीच्या राड्याच्या संदर्भात महत्त्वाची मानली जात आहे.

नारायण राणेंची प्रतिक्रिया काय ?

सदा सरवणकर यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राणे म्हणाले की, आमदार सदा सरवणकर हे माझे मित्र आहेत, काल घडलेल्या प्रकारानंतर मी त्यांची विचारपूस करायला आलो. आमची युती आहे. एकमेकांना मदत करणे ही एक युती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मी विचारपूस करण्यासाठी आलो आहे.” “तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्याचा तपास करतील. "गोळीबार झाला असे म्हणता पण आवाज आला का ? मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारी करण्याशिवाय काहीच उरले नाही. पण असे हल्ले करू नका " असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला. तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचे आहे ना ? असा सवाल ही त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in