नायरमध्ये डॉक्टरला मारहाण

प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करून रुग्णाच्या नातेवाईकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली
नायरमध्ये डॉक्टरला मारहाण

मुंबई : नायर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि निवासी डॉक्टरांमध्ये धक्काबुक्की झाली. याबाबत नाराज डॉक्टरांनी नायर रूग्णालय प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करून रुग्णाच्या नातेवाईकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. पोटात वेदना होत असल्याने एक ७० वर्षीय रुग्ण सोमवारी नायर रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या आवश्यक सर्व तपासण्या करण्यात येत होत्या. तसेच त्याच्यावर तातडीने उपचारदेखील सुरू होते. डॉ वृंदा कुलकर्णी विभागप्रमुख असलेल्या मेडिसिन विभागाच्या अखत्यारित त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णाला नेमके काय झाले याचे निदान होत नसल्याने डॉक्टरांकडून तपासण्या आणि उपचार सुरू होते. मात्र रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. मंगळवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आणि रात्री बारा वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरसोबत बाचाबाची होऊन डॉक्टरला धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांसोबतही काही प्रमाणात बाचाबाची झाली. त्यानंतर बुधवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. मेढेकर यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा करण्यात आली. या डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांची अशावेळी झालेली मनस्थिती समजून घ्यावी, अशापद्धतीने या डॉक्टरांची नाराजी काढण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in