
मुंबई : शिवडी येथे अभिनव अनिलकुमार सपारे या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध आरएके मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक अग्रवाल, ध्रुव भाटिया, श्रेयास मानू राय आणि सुनिल संघाई अशी या चौघांची नावे असून त्यांच्याकडून होणार्या अपमानास्पद वागणुकीसह कामाच्या अतिरिक्त तणावामुळे अभिनवने आत्महत्या केली होती. त्याच्या डॉक्टर पित्याने आरोपीविरुद्ध कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर दहा महिन्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार बंगळुरूतील डॉक्टर असून ते एका खासगी रुग्णालयात काम करतात. त्यांचा मुलगा अभिनव एका खासगी कंपनीत कामाला आहे. याच कंपनीत चारही आरोपी वरिष्ठ सहकारी अधिकारी म्हणून कामाला होते. अभिनव हा त्याच्या काही मित्रांसोबत शिवडीतील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याला त्याच्याच सहकारी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्रास दिला जात होता. त्याच्यावर कामाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. कामावरून त्याला अपमानास्पद वागणूक दिली जात होती.