नवजात मुलीला डॉक्टरांनी दिले जीवदान; २९ व्या आठवड्यातच बाळाचा जन्म

अकाली जन्मलेल्या नवजात बाळाचे प्रमाण भारतात सर्वांधिक आहे. अशा बाळांच्या मृत्यूंच प्रमाणही अधिक आहे
नवजात मुलीला डॉक्टरांनी दिले जीवदान; २९ व्या आठवड्यातच बाळाचा जन्म

अकाली जन्माला आलेल्या बाळाच्या मृत्यूचे प्रमाण सर्वांधिक असते. त्यामुळे अशा बाळांचा जन्म होताना आणि जन्मानंतरचे काही दिवस डॉक्टरांना विशेष लक्ष द्यावे लागते. मुंबईतील चेंबूर येथील एसआरव्ही रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. २९ व्या आठवड्यात म्हणजे अवघ्या सात महिन्यांतच जन्मलेल्या बाळाचे वजन अवघे १.३ किलो इतके होते. एक महिन्यानंतर आता या बाळाचे वजन १.७ किलो इतक झालं आहे. सध्या या बाळावर आणि आईची प्रकृती उत्तम असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अकाली जन्मलेल्या नवजात बाळाचे प्रमाण भारतात सर्वांधिक आहे. अशा बाळांच्या मृत्यूंच प्रमाणही अधिक आहे. बदलत्या जीवनशैलीसह अन्य अनेक कारणांमुळे मुदतपूर्व बाळ जन्मदराच्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रिती टोपले या महिलेला रूग्णालयात आणले तेव्हा ती २९ आठवड्याची गर्भवती होती. गर्भाशयातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गर्भातील पाणी कमी झाल्यास बाळाच्या जीवाला धोका असल्याने तातडीने सिझेरियन प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर बाळाचे वजन अवघे १.३ किलो इतकेच होते. अशा स्थितीत बाळाला लगेचच एनआयसीयूत हलविण्यात आले. विशेषतः ३८ ते ४० आठवड्यात गर्भातील बाळाचा पूर्णतः वाढ झालेली असते. परंतु, २९ आठवड्यात प्रसूती केल्यावर बाळाला वाचवणे खूपच अवघड होते. पण रूग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या बाळाला नव्याने आयुष्य मिळाले आहे. गर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने या महिलेची तातडीने सिझेरियन पद्धतीनं प्रसूती करण्यात आले. अकाली जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती अतिशय चिंताजनक होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in