डॉक्टरना समोसे पडले १.४० लाख रुपयांना

ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार
डॉक्टरना समोसे पडले १.४० लाख रुपयांना
Published on

मुंबई : हॉटेल गुरुकृपामधून केईएमच्या डॉक्टरने २५ समोसाची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर या डॉक्टरला १.४० लाख रुपयांना पडली. कारण ऑनलाईन भामट्यांनी त्यांच्या अकाऊंटमधून ही रक्कम काढून घेतली.

केईएममध्ये सर्जन असलेल्या डॉक्टरने गुरुकृपा हॉटेलमधून २५ समोसांची ऑर्डर दिली. त्याने संबंधित हॉटेलच्या खात्यात १५०० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपीने डॉक्टरला फोन करून पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट पाठवायला सांगितला. तसेच त्याला पुढील प्रक्रिया करण्यासाठी तीन लिंक पाठवल्या. त्यावर क्लिक करताच डॉक्टरच्या बँक खात्यातून जवळपास १.४० लाख रुपये गायब झाले. डॉक्टरने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in