Social Media Viral Video: रोज सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा यात काही विचित्र व्हिडीओ असतात तर कधी फारच सुंदर नजारा दाखवणारे व्हिडीओ असतात. असाच एक सुंदर दृश्य दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन दिसत आहे. मुंबईतील वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यावर एक डॉल्फिन दिसल्याची घटना सोशल मीडियावर समोर आली आहे. मुंबईच्या किनाऱ्यावरच्या डॉल्फिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
शनिवारी सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये एक डॉल्फिन खेळकरपणे पाण्यात उडी मारताना दिसत आहे. वांद्रे येथील कार्टर रोडजवळ डॉल्फिन दिसल्याचा दावा सोशल मीडिया यूजरने केला आहे.
कधी दिसला हा मासा?
शुक्रवारी, ३ मे रोजी हा सुंदर मासा दिसल्याचा दावाही युजरने केला. मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर मासे दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. या युजरने आणखी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये एक डॉल्फिन पाण्यात खोल डुबकी मारल्यानंतर पाण्यातून उडी मारताना दिसत आहे.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने असेही म्हटले आहे की, "डॉल्फिन्सला किनाऱ्याजवळ नेहमीच पाहिले जाऊ शकते. पण आम्हा मुंबईकरांकडे पाहण्यासाठी वेळ नाही." एका वापरकर्त्याने सांगितले की, "मुंबईच्या पाण्यात टिकून राहण्यासाठी त्यांच्याकडे मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे जिथे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट समुद्रात फेकले जाते." दुसऱ्या वापरकर्त्याने असेही म्हटले, "त्यांना उबदार पाणी आवडते... चांगले चिन्ह?" काही युजर्सनी मुंबईच्या रिअल इस्टेट डेव्हलेपमेंटवर टीका केली आणि म्हणाले, "येत आहे... डॉल्फिन व्ह्यू अपार्टमेंट्स. २०% किंमत वाढीसोबत."