देशांतर्गत शेअर बाजारात घसरण;सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

सोमवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स जवळपास ७५० अंकांपर्यंत घसरला होता
देशांतर्गत शेअर बाजारात घसरण;सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. सोमवारी सेन्सेक्स २०० अंकांनी घसरुन बंद झाला. तर निफ्टीही दिवसअखेरीस दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स २००.१८ अंक किंवा ०.३४ टक्का घसरुन ५७,९९१.११वर बंद झाला. दिवसभरात तो ८२५.६१ अंक किंवा १.४१ टकके घसरुन ५७,३६५.६८ या किमान पातळीवर गेला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ७३.६५ अंक किंवा ०.४३ टक्का घटून १७,२४१वर बंद झाला.

तत्पूर्वी, सोमवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स जवळपास ७५० अंकांपर्यंत घसरला होता. तर निफ्टी देखील २०० अंकांनी घसरून १७,०९० च्या पातळीवर गेला होता. बाजारात बँक, वाहन आणि धातू क्षेत्रातील समभागांमध्ये कमजोरी दिसून आली.

सेन्सेक्सवर्गवारीत एशियन पेंटस‌्, आयटीसी, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, नेस्ले आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागात घसरण झाली. तर दुसरीकडे ॲक्सिस बँक, टीसीएस, मारुती, विप्रो, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज यांच्या समभागात घसरण झाली.

आशियाई बाजारात नकारातमक वातावरण होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.८० टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ९७.१४ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारच्या व्यवहारात भांडवली बाजारातून २२५०.७७ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in