डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबईतील दगडी चाळीतील अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे
डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

'शिवसेना' हे नाव शिंदे गटाला मिळाल्यापासून अनेकांनी या पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणून आज डॉन अरुण गवळी यांच्या भावासह शेकडो दगडी चाळीतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवास्थानावर हा प्रवेश सोहळा पार पडला.

अंडरवर्ल्ड डॉन म्हणून प्रसिद्ध असलेले अरुण गवळी यांचे भाऊ प्रदिप गवळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच माजी नगरसेविका वंदना गवळी आणि दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे मुंबईतील भायखळा भागामध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा आहे. "या भागातील लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम तुमच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल," असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना पक्षात प्रवेश दिला.

logo
marathi.freepressjournal.in