आज अनंत चतुर्दशी असल्यानं मोठ्या संख्येनं लोक मिरवणुकीसाठी रस्त्यावर उतरणार असून वाजत गाजतं गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहेत. याचं पार्श्वभूमिवर मुंबई वाहतूक पोलिसांनी विसर्जनाच्या दिवशी जुन्या आणि धोकादायक अश्या पुलांचा वापर करत असाल तर काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ट्रॅफिक पोलिसांनी देखील याबाबत सुचना दिल्या आहेत. १३ जुन्या आणि धोकादायक रेल्वे पुलांवर अजिबात नाचू नका आणि गाणी वाजवू नका, कारण ते पूल फार धोकादायक आहेत, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसार करी रोड, आर्थर रोड किंवा चिंचोपोकळी, भायखळा,घाटकोपर, मरीन लाईन्स, सँडहर्स्ट रोड, फ्रेंच आरओबी ( रेल ओवर ब्रिज), केनेडी आरओबी, फॉकलँड आरओबी (ग्रॅट रोड आणि चर्नी रोड दरम्यान), मुंबई सेंट्रल येथील बेलासिसच्या, महालक्ष्मी, प्रभादेवी आणि दादर टिळक पूल या पुलांवर नाचन्यास तसंच गाणी वाजवण्यास मज्जाव केलं आहे. गणेश भक्तांनी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
दरम्यान, आज मुंबईसह राज्यात सर्वत्र गणपती विससर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक घराबाहेर पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलिसांनी सुमारे ९३ रस्ते विसर्जनासाठी बंद ठेवले आहेत. दक्षिण मुंबईत२४, मध्य उपनगरात ३२ आणि पूर्व उपनगरात २७ आणि पश्चिम उपनगरात १० च्या आहेत. गुरुवारी सकाळी १० ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.