मराठी पाट्या लावा नाही, तर एक लाख दंड; पहिल्याच दिवशी १७६ दुकाने व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई

३,२६९ दुकाने व आस्थापनांची झाडाझडती
मराठी पाट्या लावा नाही, तर एक लाख दंड; पहिल्याच दिवशी १७६ दुकाने व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई
Published on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी असोसिएशनची याचिका फेटाळल्याने आता दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाटी नसेल, तर मात्र आता एक लाखापर्यंत दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने दिला आहे. दरम्यान, मराठी पाट्या नसलेल्या १७६ दुकाने व आस्थापनांवर मंगळवारी पहिल्या दिवशी दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ३,२६९ दुकाने व आस्थापनांची पहिल्या दिवशी झाडाझडती घेतल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईतील सात लाख दुकाने व आस्थापना पैकी दोन लाख दुकाने व आस्थापनांनी प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावल्या आहेत. उर्वरित दुकाने व आस्थापनांनी मराठी पाट्या लावण्याची अंमलबजावणी न केल्याने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. मात्र व्यापारी असोसिएशनने पालिकेच्या कारवाईला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनांची याचिका फेटाळत दोन महिन्यांत मराठी पाट्या लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. २५ नोव्हेंबरची मुदत संपुष्टात आल्याने पालिका प्रशासनाने मंगळवारपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात केली.

बारला महान व्यक्ती, गडकिल्ल्यांची नावे नको

- महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. यानुसार मद्यविक्रेत्या दुकानांनाही महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

'अशी' झाली कारवाई

१ / २ / ३) ए, बी, सी विभाग: ३००/२९७/३

४) डी विभाग : ९८/८९/८

५) ई विभाग : १०१/९७/४

६) एफ दक्षिण विभाग : १४७/१४२/५

७) एफ उत्तर विभाग : ७१/६७/४

८) जी दक्षिण विभाग : १९५/१८६/९

९) जी उत्?तर विभाग : १७८/१७४/४

१०) एच पूर्व विभाग : १२७/११७/१०

११) एच पश्चिम विभाग : १४२/१३०/१२

१२) के पूर्व विभाग : १६५/१५४/११

१३) के पश्चिम विभाग : २७१/२६४/७

१४) एल विभाग : १५१/१४८/३

१५) एम पूर्व विभाग : ८९/८१/८

१६) एम पश्चिम विभाग : १५५/१४९/६

१७) एन विभाग : ८९/७१/१८

१८) पी दक्षिण विभाग : १८९/१८०/९

१९) पी उत्?तर विभाग : १०३/९६/७

२०) आर दक्षिण विभाग : १३६/१२९/७

२१) आर उत्?त्?र विभाग : २०७/२००/७

२२) आर मध्?य विभाग : १५५/१४५/१०

२३) एस विभाग : ९८/८४/१४

२४) टी विभाग : १०३/९३/१०

एकूण : ३२६९/३०९३/१७६

logo
marathi.freepressjournal.in