डॉपलर रडार गेल्या काही दिवसापासून बंद

अतिशय मोक्याच्या वेळी डॉपलर रडारचा डेटा मुंबईसाठी उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आहे.
डॉपलर रडार गेल्या काही दिवसापासून बंद

मान्सून कालावधीत अतिशय महत्त्वाची माहिती पुरवणाऱ्या हवामान विभागाच्या डॉपलर रडारचा खोळंबा यंदाच्या वर्षीही दिसून आला. अतिशय महत्त्वाच्या काळात डॉपलर रडारचा बिघाड किंवा नादुरुस्ती गेल्या काही वर्षांतही दिसून आली आहे. सध्या मान्सून मुंबईत दाखल झाला असतानाही कुलाब्यातील डॉपलर रडार दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. त्यामुळे अतिशय मोक्याच्या वेळी डॉपलर रडारचा डेटा मुंबईसाठी उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आहे.

मुंबईच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला डॉपलर रडारच्या माध्यमातून मान्सूनबाबतच्या अपडेट्स मिळत असतात. अनेकदा एखाद्या नैसर्गिक आपत्तीबाबतचा अलर्ट रडारच्या माध्यमातून मिळत असतो. सध्या मुंबईत मान्सून दाखल झालेला असतानाही पाच दिवसांपासून डॉपलरकडून येणारी माहिती बंद झालेली आहे.

आतापर्यंत झालेले बिघाड

२०१० डॉपलर रडार बंद पडले

२०१७ ओखी वादळाच्या वेळीही रडार नादुरुस्त

२०१९ जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टीच्या काळात बंद

२०२० जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाच्या ४८ तास आधीच डॉपलर रडार बंद

२०२१ डॉपलर रडार ९ जून रोजी बंद होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in