आता मुंबईत हवेत उडणार डबलडेकर बस; नितीन गडकरींची भन्नाट संकल्पना

गडकरींनी शनिवारी मुंबई आयआयटीमध्ये हवेतील डबलडेकर बसची संकल्पना मांडली.
आता मुंबईत हवेत उडणार डबलडेकर बस; नितीन गडकरींची भन्नाट संकल्पना

मुंबईत वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी हवेत उडणारी डबलडेकर बस हवी, असे स्वप्न केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहन मंत्री नितीन गडकरींनी मुंबईकरांना दाखवले आहे. त्यासाठी गडकरींनी शनिवारी मुंबई आयआयटीमध्ये हवेतील डबलडेकर बसची संकल्पना मांडली.

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसमोर नितीन गडकरी यांनी जबरदस्त भाषण केले. त्यावेळी गडकरी म्हणाले की, “हवेत चालणारी डबलडेकर बस मुंबईत हवी आहे, त्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. पवई ते नरिमन पॉईंट हवेतून प्रवास करण्याचे स्वप्न आहे. पवईतून डोंगरांवरून निघून नरिमन पॉईंटला हवेतून बसने जाता येणार. यामुळे तुमचा प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचेल. वाहतूक व्यवस्थेत नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला हवा.”

दरम्यान, याआधी गडकरी यांनी पुण्यातल्या वाहतूक कोंडीवरवरही भाष्य केले होते. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी यांनी उडत्या बसचा पर्याय काही महिन्यांपूर्वी दिला होता.

केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा, असे गडकरी म्हणाले होते.

“मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीचा वापर व्हावा. बंगळुरुत इतका ट्रॅफिक जाम आणि मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही मी हवेतून चालणाऱ्या डबलडेकर बसची संकल्पना सांगितली होती. ज्या शहरात रस्ते मोठे करता येत नाहीत. जमीन अधिग्रहणाबाबत समस्या निर्माण होतात, अशा शहरांमध्ये स्कायबसचा पर्याय उपयुक्त आहे,” असे नितीन गडकरी म्हणाले होते. दोन टेकड्यांमध्ये धावणारी २०० प्रवासी क्षमता असणारी स्कायबस फिलिपिन्समध्ये सुरू आहे. याच धर्तीवर भारतात स्कायबस सुरू करण्याचा गडकरींचा विचार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in