Mumbai : मुंबईकरांसाठी खुशखबर; आता १४ जानेवारीपासून मुंबईच्या रस्त्यावर धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस

१४ जानेवारी २०२३ पासून १० डबल डेकर बसेस मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावरुन धावणार आहेत. तर, डिसेंबर २०२३ पर्यंत ९०० ईलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेत येणार
Mumbai : मुंबईकरांसाठी खुशखबर; आता १४ जानेवारीपासून मुंबईच्या रस्त्यावर धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस
Published on

मुंबईकरांसाठी (Mumbai) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बेस्टचे (BEST) महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी २०२३पासून १० ईलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसेस मुंबईच्या रस्त्यावरुन धावणार आहेत. तर, डिसेंबर २०२३पर्यंत 900 ईलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत. मुंबई शहरात बसने प्रवास करणाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.

प्रवासी क्षमता वाढविण्यासोबतच डिझेलवरील खर्च कमी करण्यासाठी बेस्टने ९०० ईलेक्ट्रिक बसेसचा ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी पहिल्या ५० बस जानेवारी महिन्यापासून मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. २०२८ पर्यंत शहरात चालणाऱ्या सर्व डिझेल बसेस इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याची सरकारची योजना आहे. राज्य सरकारने याबाबत सांगितले की, बेस्टच्या सर्व बस एकतर पूर्णपणे इलेक्ट्रिकवर धावतील किंवा त्या हायड्रोजन इंधन सेलवर चालवल्या जाणार आहेत. कोणत्या माध्यमाने बसेस चालवणे अधिक सुरक्षित आणि कमी खर्चिक असेल हे यावर अवलंबून असेल.

logo
marathi.freepressjournal.in