बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन; चैत्यभूमीतून एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. सदर अनुयायांना विविध प्रकारच्या नागरी सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.
बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन; चैत्यभूमीतून एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादरस्थित चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, 'राजगृह' येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे. यात बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चैत्यभूमीतून एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण, पिण्याचे पाणी, करण्यात येणार आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. सदर अनुयायांना विविध प्रकारच्या नागरी सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. पालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमलेले आहेत. उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि सहाय्यक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार अंबी यांच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

चैत्यभूमी परिसर सुशोभीकरण

चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तुपाची सजावट ही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच तोरणा द्वार, अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेक देखील सजवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in