डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भागाचे जल्लोषात स्वागत

दादर येथील इंदू मिलमध्ये प्रस्तावित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. या स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीला सुरुवात झाली असून, त्या पुतळ्याचा एक भाग सोमवारी ठाण्यातून दादरकडे नेण्यात आला.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भागाचे जल्लोषात स्वागत
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भागाचे जल्लोषात स्वागतछायाचित्र : विजय गोहिल
Published on

ठाणे : दादर येथील इंदू मिलमध्ये प्रस्तावित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. या स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीला सुरुवात झाली असून, त्या पुतळ्याचा एक भाग सोमवारी ठाण्यातून दादरकडे नेण्यात आला. यावेळी ठाण्यातील आंबेडकरी अनुयायांनी या भागाचे जोरदार स्वागत केले.

आंबेडकरी समुदायाला या भागाच्या आगमनाची माहिती मिळताच, भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, प्रल्हाद मगरे आदींच्या पुढाकाराने शेकडो आंबेडकरी बांधव कॅडबरी सिग्नल येथे एकत्र आले.

छायाचित्र : विजय गोहिल
छायाचित्र : विजय गोहिल

पुतळ्याचा भाग घेऊन आलेल्या गाडीचा चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला कपडे आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. कॅडबरी सिग्नल ते नितीन कंपनीपर्यंत या भागाची मिरवणूक काढण्यात आली.

छायाचित्र : विजय गोहिल

याप्रसंगी भास्कर आरकडे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, विमल शरणागत, विमल सातपुते, विनोद भालेराव, रवींद्र शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in