डॉ. स्वप्निल निला मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी

डॉ. स्वप्निल निला यांना २०१९ मध्ये राष्ट्रीय रेल्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना २०१६ मध्ये महाव्यवस्थापकाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
डॉ. स्वप्निल निला मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी
Published on

मुंबई : भारतीय रेल्वे वाहतूक सेवा २०११ बॅचचे अधिकारी डॉ. स्वप्निल धनराज निला यांनी १ जानेवारी २०२४ रोजी, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) म्हणून पदभार स्वीकारला आहे. डॉ. स्वप्निल निला हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून वैद्यकीय पदवीधर असून, डॉ. शिवराज मानसपुरे यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

डॉ. स्वप्निल निला हे मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच डॉ. स्वप्निल निला यांनी विभागीय परिचालन व्यवस्थापक (आईसी), भुसावळ विभाग; विभागीय परिचालन व्यवस्थापक, मुंबई विभाग; क्षेत्र व्यवस्थापक (एरिया मॅनेजर), भुसावळ विभाग आणि सहाय्यक परिचालन व्यवस्थापक (गुड्स), भुसावळ विभाग याठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले आहे.

डॉ. स्वप्निल निला यांना २०१९ मध्ये राष्ट्रीय रेल्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना २०१६ मध्ये महाव्यवस्थापकाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. वर्ष २०१४ मध्ये सर्वोत्कृष्ट रेल्वे सेवा अधिकारी, वाणिज्यिक विभाग या पुरस्काराचे देखील डॉ. स्वप्निल निला हे प्राप्तकर्ता आहेत.

logo
marathi.freepressjournal.in