नालेसफाईची माहिती, व्हिडीओ आता घरबसल्या; मुंबईकरांसाठी BMC कडून संकेतस्थळाची सोय

यंदाची नाले व नदी सफाई ही पारदर्शकपणे करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्याने यावर्षी एआय या तंत्राचा वापर करून नाले सफाई केली जात आहे.
नालेसफाईची माहिती, व्हिडीओ आता घरबसल्या;  मुंबईकरांसाठी BMC कडून संकेतस्थळाची सोय
Published on

मुंबई : यंदाची नाले व नदी सफाई ही पारदर्शकपणे करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्याने यावर्षी एआय या तंत्राचा वापर करून नाले सफाई केली जात आहे, हात सफाई करणाऱ्या कंत्राटदारांना चाप बसला असून आता मुंबईकर नागरिकांना आपल्याा परिसरातील नाल्याची स्वच्छता केली जात आहे की नाही, याबाबतची छायाचित्रे, चलचित्रे दररोज अद्ययावत स्थितीमध्येत महानगरपालिकेच्या ई- संकेतस्थतळावर पाहता येतील. याकरिता मुंबई महापालिकेच्या या 'https://swd.mcgm.gov.in/wms2025' संकेतस्थळावर ती अपलोड करता येतील.

यामध्ये नाला स्वच्छतेची तारीख आणि व्हिडीओ संकेतस्थनळावरील लिंकद्वारे पाहता येतील. नाले स्वच्छता प्रक्रियेची पारदर्शकता राहील यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नयशील आहे. त्या‍दृष्टीने स्वयंप्रकटन तत्त्वानुसार, सर्व माहिती उपलब्ध आहे.

वजन व्यवस्थापन प्रणालीची वैशिष्ट्ये

प्रमुख नाले भू-स्थानिक संदर्भीत केलेले आहेत. लहान नाल्यांसाठी विभागाला भू-कोडीकरण केले आहे. तसेच प्रत्येक अभियंत्यासाठी विशिष्ट लॉगइन असलेले ॲप गाळ भरण्याच्या आधी, भरण्याच्या वेळी आणि भरण्यानंतर छायाचित्र व व्हिडीओ घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून केवळ गाळच वाहतूक केला जाईल, याची खात्री होईल. हे मोबाईल ॲप नाल्याच्या सीमेपासून २० मीटरच्या आतच कार्य करेल, ॲप लॉगइन विशिष्ट उपकरणाशी संलग्न असल्याने ते एका लॉगइनने दुसऱ्या डिव्हाइसवर लॉगइन करता येणार नाही.

इमेज घोस्टिंग शोधण्याची सुविधा

अस्पष्ट प्रतिमा टाळण्यासाठी मोबाइल ॲपमध्ये इमेज घोस्टिंग शोधण्याची प्रणाली अपडेट करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनासाठी स्वयंचलित लॉग-शीट/ट्रिप क्रमांक, वाहनाच्या संपूर्ण प्रवासाचा मागोवा ठेवण्यासाठी प्रत्येक ट्रिपसाठी वेगळा क्रमांक आहे.

गाळ निर्मूलनाची प्रक्रिया

संकलन : नाल्यांमधून गाळ उपसून तो नाल्याच्या काठावर ४८ तास वाळवणे, त्यानंतर वाहतूक करणे.

वाहतूक : वाहनामध्ये गाळ भरून नामनिर्दिष्ट वजन काट्यावर तौलणी करणे आणि त्यानंतर तो निर्दिष्ट विल्हेवाट स्थळी पोहोचवणे.

विल्हेवाट : निर्दिष्ट विल्हेवाट स्थळी वाहन रिकामे करून, रिकाम्या वाहनाचे पुन्हा वजन काट्यावर वजन करणे.

logo
marathi.freepressjournal.in