Mumbai : ५० लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या 'डीआरआय'च्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) दोन तत्कालीन गुप्तचर अधिकाऱ्यांनी एका आरोपीकडून ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकारणी ‘केंद्रीय अन्वेषण विभागाने’ (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीला ‘डीआरआय’ने अटक केली होती आणि त्याला या प्रकरणात सवलत देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती.
Mumbai : ५० लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या 'डीआरआय'च्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा
Published on

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) दोन तत्कालीन गुप्तचर अधिकाऱ्यांनी एका आरोपीकडून ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकारणी ‘केंद्रीय अन्वेषण विभागाने’ (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीला ‘डीआरआय’ने अटक केली होती आणि त्याला या प्रकरणात सवलत देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती.

‘सीबीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘डीआरआय’ मुंबईच्या सहसंचालकांनी या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला होता. डी. कुमार हे ‘डीआरआय’ मुंबईत वरिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सी. पारिक हे ‘डीआरआय’मध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. या दोघांनी एका व्यक्तीला ३० सप्टेंबर २०२५ रोजी कोलकाता विमानतळावरून अटक केली होती. ही व्यक्ती चार दिवस ‘डीआरआय’ कोठडीत असताना कुमार आणि पारिक यांनी त्याला मदत करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in