महिला पोलीस शिपयाशी हुज्जत घालणाऱ्या चालकास अटक

परवाना व कागदपत्रे देण्यास नकार दिला
महिला पोलीस शिपयाशी हुज्जत घालणाऱ्या चालकास अटक
Published on

मुंबई : महिला पोलीस शिपायाशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणूल्याप्रकरणी सुनिल अनेश तिवारी या वाहनचालकास चारकोप पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कांदिवलीतील चारकोप परिसरात भाग्यश्री साईनाथ शिंदे या राहत असून त्या वाहतूक विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. सध्या तिची नेमणूक कांदिवली वाहतूक चौकीत आहे. सोमवारी सकाळी भाग्यश्री या त्यांच्या सहकार्‍यासोबत कांदिवलीतील चारकोप, लिंक रोड, ऑर्चिड इमारतीसमोरील बॉबी जंक्शनजवळ कर्तव्य बजावित होत्या. दुपारी साडेबारा वाजता एक टाटा ऐस वाहन भरवेगात जात असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने या वाहनचालकाला थांबण्याचा प्रयत्न केला. चालकाकडे परवानासह वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने परवाना व कागदपत्रे देण्यास नकार दिला. त्यामुळे भाग्यश्री शिंदे हिने त्याला बाहेर येण्यास सांगण्यात आले. यावेळी त्याने तिच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने तिच्या हाताला जोरात धक्का देऊन कुठलेही कागदपत्रे देणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर अशी धमकी दिली. यावेळी त्याने त्याच्या मोबाईलवरुन व्हिडीओ काढून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करु लागला. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या सूर्यवंशी, देसाई, घरात, भराड या अंमलदाराच्या निदर्शनास येताच त्यांन त्याला चौकशीाठी ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याविरुद्ध भाग्यश्री शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. सुनिल हा वसईतील धानीव बाग, भगवान टेकडी, गंगडेपाड्यातील साई-श्रद्धा चाळीत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in