वाहतूक पोलिसांना ई-चलान मशीनचा वापर बंधनकारक ; खासगी मोबाइलमधून छायाचित्रे काढता येणार नाही

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो.
वाहतूक पोलिसांना ई-चलान मशीनचा वापर बंधनकारक ; खासगी मोबाइलमधून छायाचित्रे काढता येणार नाही

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्र काढण्यासाठी आता पोलिसांना ई-चलान मशीनचाच वापर करावा लागणार आहे. त्यांना स्वतःच्या खासगी मोबाइलमधून वाहनचालकांची छायाचित्रे काढता येणार नाहीत. वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो. वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्यांच्या गाड्यांचे क्रमांक आपल्या मोबाइलमध्ये टिपतात आणि नियम मोडणाऱ्यांना थेट त्यांच्या घरी दंडाचे चलान पाठवले जाते; मात्र आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचे खासगी मोबाइलमधून छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली आहे. काही वाहतूक पोलिसांकडून ई-चलानचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचे खासगी मोबाइलमध्ये चित्रण करून नंतर तडजोड करण्यात येत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्यामुळे राज्याचे वाहतूक विभागाचे अतिरिक्त महासंचालक कुलवंत सारंगल यांनी याची गांभीर्याने दखल घेत नवे धोरण ठरवले आहे. त्यानुसार आता ई-चलान मशीनचाच वापर करावा लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडले की, पावती फाडली जाते. अनेकदा चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो. चुकीच्या पद्धतीने दंड आकारला असेल तर अपील करण्याची किंवा हेल्पलाइनवर तक्रार करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in