मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी; उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

२२ मार्च ते २० एप्रिलदरम्यान हे बंदी आदेश लागू राहणार आहेत.
मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी; उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅण्डग्लायडर्स, हॉट एअर बलून यांच्या उड्डाणाना बंदी घालण्यात आली आहे.

२२ मार्च ते २० एप्रिलदरम्यान हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. अतिरेकी, देशविरोधी आणि विघातक शक्ती मुंबईवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट किंवा पॅराग्लायडरचा वापर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खबरदारी घेत हे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर १८८ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in