नौदलाच्या परिसरात ड्रोन उडवले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

कफ परेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी नेव्ही नगर येथील टीआयएफआर गेटवर सेवा बजावणाऱ्या मुख्य सुरक्षा अधिकारी निकेश कोटियन यांना संध्याकाळी भगव्या रंगाचे ड्रोन आकाशात उडाल्याचे दिसले.
नौदलाच्या परिसरात ड्रोन उडवले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी असतानाही, नौदलाच्या टीआयएफआर गेटजवळ अज्ञाताने ड्रोन उडवल्याची तक्रार नौदलाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली आहे. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे. कफ परेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी नेव्ही नगर येथील टीआयएफआर गेटवर सेवा बजावणाऱ्या मुख्य सुरक्षा अधिकारी निकेश कोटियन यांना संध्याकाळी ६.४० वाजताच्या सुमारास भगव्या रंगाचे ड्रोन आकाशात उडाल्याचे दिसले.

मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमिनीलगतच्या एक फूट वरती हे ड्रोन दिलस्याने कोटियन यांनी याची कल्पना आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर हे ड्रोन आकाशात उडताना त्यांना दिसले. मात्र ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा शोध त्यांना लागला नाही. त्यामुळेच त्यांनी थेट कफ परेड पोलीस ठाणे गाठत याप्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ड्रोन उडवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in