
मुंबई : मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धारावी आणि दहिसर परिसरातून ५ कोटी रुपयांचे एमडी नावाचे ड्रग्ज जप्त केले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यात एका नायजेरियन व्यक्तीचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २६ वर्षीय शाहरूख शेख याला धारावी येथील माटुंगा लेबर कॅम्पमधून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४ किलो ७४० ग्रॅम ड्रग्ज सापडले. त्याच्या घरातून कांदिवलीत राहणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीलाही अटक करण्यात आली. या आरोपींविरोधात एमडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही ड्रग्ज तस्कर असून त्यांना कोर्टात दाखल करण्यात आले.
तत्पूर्वी, मुंबई क्राइम ब्रांचने मुंब्रा येथून एका व्यक्तीकडून ८ किलो उच्च दर्जाचे चरस जप्त केले होते. त्याची किंमत २.४ कोटी रुपये इतकी आहे.