मुंबई : 'काय होतं हे बघण्यासाठी' दारूच्या नशेत फायरब्रिगेडला फोन केला, पोलीस कोठडीत पोहोचला

फोन का केला?, असे विचारले असता 'फोन केल्यानंतर काय होते हे बघायचे होते' असे अजब उत्तर त्याने दिले.
मुंबई : 'काय होतं हे बघण्यासाठी' दारूच्या नशेत फायरब्रिगेडला फोन केला,  पोलीस कोठडीत पोहोचला
Published on

मुंबई : अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून आपल्या इमारतीला आग लागल्याची खोटी माहिती देणाऱ्या वरळी येथील ३३ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

लोअर परळ ते वरळी परिसरात पांडुरंग बुधकर मार्गावर असलेल्या एसआरए महालक्ष्मी इमारतीला आग लागल्याची माहिती शनिवारी दुपारी वरळी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला भायखळा अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातून मिळाली. इमारतीच्या सी विंगला आग लागली असून आपत्कालीन सेवेची गरज आहे, असे फोन करणाऱ्याने भायखळा कंट्रोलला सांगितले होते.

वरळी कंट्रोलला माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी हरिश्चंद्र नारकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या एकूण सहा गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. ते पोहोचले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी आग लागल्याचे दिसले नाही. त्यांनी स्थानिकांकडे चौकशी केली असता त्यांनी परिसरात आगीची कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. नारकर हे भायखळा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करून खोट्या अलर्टची माहिती देत होते तेव्हा स्वतःहून एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि आगीबाबत नियंत्रण कक्षाला फोन केल्याचे सांगितले.

काय होतं ते बघायचं होतं -

फोन का केला?, असे विचारले असता शिवराज उमेश अरुंथथियार नावाच्या त्या इसमाने 'फोन केल्यानंतर काय होते हे बघायचे होते' असे अजब उत्तर नारकर यांना दिले. तो एसआरए महालक्ष्मी बिल्डिंगमध्ये राहतो. वरळीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराजने नियंत्रण कक्षात फोन केला तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. "कोणताही विशिष्ट हेतू नाही, तो फक्त मद्यधुंद होता आणि त्याला त्याच्या इमारतीतील सर्वांना त्रास द्यायचा होता. आम्ही त्याला घटनास्थळीच अटक केली, असे काटकर यांनी सांगितले. “कोणताही विशिष्ट हेतू नव्हता, तो फक्त नशेत होता आणि त्याला त्याच्या इमारतीतील प्रत्येकाला त्रास द्यायचा होता. आम्ही त्याला जागीच अटक केली,” असे काटकर म्हणाले.आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 182 , 505 (2) आणि 507 अंतर्गत आरोप ठेवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in