लालबागमध्ये मद्यपी प्रवाशाने बसचालकाला स्टेअरिंगवरून खेचले; ९ जणांना उडवले; एका तरुणीचा मृत्यू

ही विचित्र घटना रविवारी रात्री घडली. त्यावेळी बस गणेश सिनेमागृहाजवळ होती.
मृत नुपूर मणियार
मृत नुपूर मणियार
Published on

मुंबई : बेस्टची क्रमांक ६६ वरील बस रविवारी रात्री लालबागमधून जात असताना एका मद्यपी प्रवाशाने बसचालकाला स्टेअरिंग-वरून खेचले. यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसने ९ पादचाऱ्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांपैकी एकीचा रुग्णालयात मृत्यू झाला. 

ही विचित्र घटना रविवारी रात्री घडली. त्यावेळी बस गणेश सिनेमागृहाजवळ होती. काळाकिल्ला आगारातील बस ओलेक्ट्रा कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. भाटिया बाग येथून ही बस राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात होती.

गणेश सिनेमागृहाजवळ बस आल्यावर मद्यपी प्रवाशाने बसचालकाला स्टेअरिंग-वरून खेचले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने नंतर ९ पादचाऱ्यांना धडक दिली. केईएम रुग्णालयात उपचार्थ जखमींपैकी नुपूर मणियार (२८) या तरुणीला अतिदक्षता विभागात मृत घोषित करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in