सहाय्यक फौजदारावर हल्ला करणाऱ्या मद्यपी तरुणाला अटक

अरेरावीची भाषा करून त्यांच्या अंगावर दारू फेकून धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जोरात लाथही मारली.
सहाय्यक फौजदारावर हल्ला करणाऱ्या मद्यपी तरुणाला अटक

मुंबई : रस्त्यावर मद्यपप्रशन करण्यास मज्जाव केला म्हणून पोलीस अधिकाऱ्यावर अंगावर धावून त्याला लाथेने मारहाण झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सागर सुरेश ठोंबे या २४ वर्षांच्या तरुणाविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

ही घटना रविवारी रात्री उशिरा एक वाजता चेंबूर येथील टिळकनगर कॉलनी, सह्याद्री गार्डनमध्ये घडली. संपत राजाराम म्हस्के हे सहाय्यक फौजदार म्हणून टिळकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शनिवारी ते सहकाऱ्यांसोबत परिसरात गस्त घालत असताना, सागर ठोंबे हा रस्त्यावर मद्यप्राशन करताना दिसून आला. त्यामुळे त्यांनी त्याला घरी जाण्यास सांगितले. यावेळी त्याने त्यांच्याशी अरेरावीची भाषा करून त्यांच्या अंगावर दारू फेकून धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जोरात लाथही मारली.

logo
marathi.freepressjournal.in