कौटुंबिक वादातून पत्नीला पतीने रॉकेल ओतून पेटवून दिले

प्रकार संशयास्पद वाटल्याने तिची नायक तहसीलदार अशोक सानप यांच्यासमोर पुन्हा जबानी नोंदविण्यात आली होती.
कौटुंबिक वादातून पत्नीला पतीने रॉकेल ओतून पेटवून दिले

मुंबई : कौटुंबिक वादातून पत्नीला पतीने रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेत गुड्डी अजय परमार ही महिला भाजली असून, तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिला वाचविताना तिचा पती अजय राजीव परमार याच्या हाताला दुखापत झाली होती. याप्रकरणी अजय परमारविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत अद्याप त्याला अटक झाली नाही. अजय हा त्याच्या पत्नी गुड्डीसोबत जोगेश्‍वरीतील साईमंदिर, साईधामवाडीत राहतो. घरात स्टोव्हचा भडका उडून ते दोघेही भाजल्याचा कॉल अंधेरी पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यामुळे अंधेरी पोलिसांचे एक विशेष पथक कूपर रुग्णालयात गेले होते. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी एक प्लास्टिकची बाटली, जळालेल्या कपड्याचे तुकडे आणि तुटलेले इमिटेशनचे डोरले सापडले. गुड्डूने स्टोव्हचा भडका उडाल्याचे तिच्या जबानीत सांगितले होते; मात्र तिथे पोलिसांना स्टोव्ह मिळून आला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिची नायक तहसीलदार अशोक सानप यांच्यासमोर पुन्हा जबानी नोंदविण्यात आली होती. यावेळी तिने तिच्या पतीसोबत तिचे दोन दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होते. तो ड्रग्जच्या आहारी गेल्याने त्यांच्यात सतत खटके उडत होते. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. तिने त्याला त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याची धमकी दिली होती. यावेळी त्याने तिला अडविले आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर त्यानेच तिच्या अंगावर पाणी ओतून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तिला पोलिसांत तक्रार केल्यास मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in