मुंबई : दहिसर पूर्व चेकनाका येथे अदानी इलेक्ट्रिसिटीचे केबल दुरुस्तीचे काम सुरू असताना ९ इंचाची जलवाहिनी फुटली. पालिकेच्या जलविभागाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि दहिसर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे पालिकेच्या जलविभागाकडून सांगण्यात आले.
दहिसर पूर्व चेकनाका, हारेम टेक्सटाइल, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ अदानी इलेक्ट्रिसिटीचे केबल दुरुस्तीचे काम सुरू असताना ९ इंचाची जलवाहिनी फुटल्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया गेले. जल विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि मंगळवारी पहाटे ४ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दरम्यान, जलवाहिनी फुटल्याने कुठल्याही विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला नसल्याचे जलविभागाकडून सांगण्यात आले.