उन्हाळी सुट्ट्यांमुळे राणी बाग बच्चेकंपनीसह पर्यटकांनी गजबजून गेली

उन्हाळी सुट्ट्यांमुळे राणी बाग बच्चेकंपनीसह पर्यटकांनी गजबजून गेली
Published on

मुंबई भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणी बाग) उन्हाळी सुट्ट्यांमुळे बच्चेकंपनीसह पर्यटकांनी गजबजून गेले आहे. शनिवार आणि रविवारी पर्यटकांची सर्वाधिक गर्दीची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत तब्बल ४३ हजार ७२८ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यामुळे राणीबागेच्या महसूलात १५ लाख ९८ हजार ९०० रुपयाची भर पडल्याची माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष राणीबाग बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना आटोक्यात आल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे राणीबागेत मुंबईकर - पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष राणीबागेच्या महसूलाला फटका बसला होता. मात्र आता गर्दी वाढत असल्याने महसूलात भर पडते आहे. सध्या मुलांना उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे. त्यामुळे बच्चे कंपनीची राणीबागेत गर्दी वाढली आहे. शनिवारी, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने राणीबाग गजबजून जाते आहे. शनिवारी तब्बल १७, ६१७ लोकांनी राणीबागेला भेट दिली. त्यामुळे ६ लाख ५४ हजार १७५ रुपये इतका महसूल मिळाला. तर रविवारी २६१११ पर्यटकांनी भेट दिल्याने ९,४४,७२५ रुपये उत्पन मिळाले. त्यामुळे या दोन दिवसांत तब्बल ४३ हजार ७२८ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यामुळे १५ लाख ९८ हजार ९०० रुपये इतका महसूल उद्यानाला प्राप्त झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in