पावसाळ्यात सौंदर्यीकरणाचा बेरंग अनेक ठिकाणचा झगमगाट बंद, भिंतीवरील कलर उडाला

दक्षता विभाग घेणार झाडाझडती
पावसाळ्यात सौंदर्यीकरणाचा बेरंग 
अनेक ठिकाणचा झगमगाट बंद, भिंतीवरील कलर उडाला

मुंबई : नियोजन शून्य कारभारामुळे कोट्यवधी रुपये खर्चून मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र पावसाची सुरुवात होताच सौदयीकरणाच्या रंगाचा बेरंग झाला. अनेक ठिकाणी करण्यात आलेली विद्युत रोषणाई बंद पडली, तर भिंतींवर केलेली रंगरंगोटीचा कलर उतरला. त्यामुळे सुमारे ८०० कामांसाठी तब्बल २२०० कोटींचा खर्च केला तो व्यर्थ झाला, अशी टीका माजी नगरसेवकांनी केली आहे. दरम्यान, पालिकेच्या दक्षता विभागाकडून सौंदर्यीकरणाची तपासणी केली जाणार आहे. या कामांचा दर्जा राखला गेला नसल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मिंधे सरकारच्या दबावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याचा आरोप नागरिकांसह विविध राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ‘जी/२०’सारख्या परिषदांसाठी दिखावा करण्यासाठी केलेल्या झगमगाटावरून पालिकेवर चांगलीच टिका झाली. यामध्ये रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झोपड्या दिसू नयेत यासाठी लावण्यात आलेल्या पडद्यांवरून पालिकेवर मोठी टिकाही झाली, तर आता पावसाळ्यात या कामांचा दर्जा उघडा पडल्याने दक्षता विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in