कोस्टल रोडच्या कामात मावळाची गरुडझेप; एका महिन्यात ४५६.७२४ मीटर बोगद्याचे काम फत्ते

कोस्टल रोडच्या प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू आहे
कोस्टल रोडच्या कामात मावळाची गरुडझेप; एका महिन्यात ४५६.७२४ मीटर बोगद्याचे काम फत्ते

प्रदूषणमुक्त, सुखकर प्रवास मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोस्टल रोडच्या कामात दोन बोगदे खोदण्यात येत असून एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बोगद्याच्या कामात ४५६.७२४ मीटरचा टप्पा एका महिन्यात, तर १४०.१६८ मीटरचा टप्पा एका आठवड्यात खोदण्याचा जागतिक विक्रम मावळ्याने केला आहे. विशेष म्हणजे, याआधी तुर्कीच्या रेल्वे प्रकल्पात ४५५.४ मीटर व १३३.२ मीटर इतक्या विक्रमाची नोंद झाली होती. त्यामुळे तुर्कीच्या रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत मावळाने गरुडझेप घेतली आहे.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण असून कोस्टल रोडच्या प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या कामात दोन महाकाय बोगदे बांधण्यात येत आहेत. चारमजली इमारतीची उंची असणार्‍या ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशिनने २.०७२ किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात येत आहेत. यातील पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा १० जानेवारी, २०२२ रोजी पूर्ण झाला आहे, तर दुसर्‍या बोगद्याचे सद्य:स्थितीत १०४२ मीटर म्हणजेच ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

प्रकल्पातील दुसर्‍या बोगद्याचा ब्रेक थ्रू डिसेंबर २०२२ मध्ये होईल, तर पूर्ण प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करून मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in