पर्यावरणपूरक ई-बसेस प्रवाशांच्या सेवेत, बोरिवली-ठाणे-नाशिक दरम्यान धावणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन

बोरिवली-ठाणे-बोरिवली दरम्यान धावणाऱ्या ई-बसेसचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी ३ वाजता ठाणे येथील खोपट बसस्थानकात होणार आहे.
पर्यावरणपूरक ई-बसेस प्रवाशांच्या सेवेत, बोरिवली-ठाणे-नाशिक दरम्यान धावणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन

मुंबई : प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक, वातानुकूलित तरीही किफायतशीर दर, ३४ आसनी महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट दरात सवलत आरामदायी ई-बसेस मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावणार आहेत. बोरिवली-ठाणे-बोरिवली दरम्यान धावणाऱ्या ई-बसेसचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी ३ वाजता ठाणे येथील खोपट बसस्थानकात होणार आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १४ हजार ६० बसेस आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी एसटीचे चालक व वाहक पार पाडतात. परंतु घाट चढण्यात अनेक वेळा एसटीच्या मोठ्या गाड्या कमी पडतात. आतापर्यंत एसटीच्या ताफ्यात डिझेल बसगाड्या होत्या; मात्र आता एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस घेण्यास प्राधान्य दिले असून, एसटी महामंडळाने ९ मीटरच्या २ हजार ३०० मिडी बस गाड्या व १२ मीटरच्या मोठ्या २ हजार ८५० गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १०० मोठ्या बस दाखल झाल्या असून त्या दादर-पुणे, बोरिवली-पुणे व ठाणे-पुणे या मार्गावर धावत आहेत. तर ९ मीटरच्या २ हजार ३०० मिनी बसेस पैकी पहिल्या २० बसेस एसटीच्या ताफ्यात ठाणे १ आगारात दाखल झाल्या आहेत. एसटी महामंडळाने ५१५० वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जिंग स्थानके निर्माण केली जात आहेत. या प्रकल्पाची सुरुवात बोरिवली-ठाणे-नाशिक या मार्गावर या बसेस सुरू करून, करण्यात येत आहे.

ई-बसेसचे तिकीट दर

ठाणे-बोरिवली - ६५ रु.

ठाणे-नाशिक (भिवंडी मार्ग) - ३५० रु.

ठाणे-नाशिक (भिवंडी बायपास) - ३४० रु.

बोरिवली-ठाणे-नाशिक (भिवंडी बायपास) - ४०५ रु.

logo
marathi.freepressjournal.in